Thursday, 19 May 2011
'महाराष्ट्र केसरी' संजय पाटील यांची हत्या
संजय पाटील यांच्यावर समोरुन चौघांनी अंदाधुंद गोळीबार केला . पोटात आणि पाठीत गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते . जखमी अवस्थेत त्यांना जवळच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . मात्र , गोळ्या लागून प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असलेले संजय पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापतीही होते . अलिकडेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या विजयात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता . राजकीय वैमनस्यातून संजय यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता पोलिस व्यक्त करत आहेत . संजय यांचे पंतप्रधान कार्यालयातील मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी घनिष्ठ संबंध होते .
१९९२ साली अमरावतीत 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकाविलेले संजय पाटील पंचायत समितीचे उपसभापती होते. नुकतेच ते कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकपदावरही निवडून आले होते. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गोळेश्वर गावी दुपारी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी निघत असताना पाटील यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्यावर एकूण १३ गोळ्या झाडण्यात आल्या. कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या पाथिर्वावर आटके या मूळगावी हजारो कुस्ती शौकिनांच्या व चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरीच्या लढती, सांगवी
पुण्याच्या विजय बनकरने आपल्या वडीलांप्रमाणे 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकावण्याची करामत केली. येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत झालेल्या जेतेपदाच्या लढतीत वेगवान खेळाला आक्रमतेची जोड देत बनकरने बीडच्या सईद चाऊसवर मात केली.
६० हजारपेक्षा अधिक कुस्तीशौकिनांनी खचाखच भरलेल्या मैदानात पहिल्या मिनिटापासून बनकरने सुरेख खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला त्याने चाऊसचा एकेरी पट काढला आणि त्याला मैदानाबाहेर नेत भारद्वाज डावाचे लक्षवेधी प्रदर्शन घडवले. पहिली फेरी बनकरने ३-१ अशी जिंकली.
दुसऱ्या फेरीत चाऊसने आपला सारा अनुभव पणाला लावत बनकरला जोरदार लढत दिली. तीन वर्षांपूवीर् 'महाराष्ट्र केसरी' ठरलेल्या भीमकाय देहाच्या चाऊसने या फेरीतील शेवटच्या मिनिटात बनकरचा दुहेरी पट काढत १-१ अशी बरोबरी साधली.
शेवटच्या निर्णायक फेरीत सईदच्या पंजाची पकड सैल होताच बनकरने १ गुण घेत 'महाराष्ट्र केसरी' किताबावर आपले नाव कोरले. साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष जेतेपदाच्या या कुस्तीवर लागले होते. चंदहार पाटीलला हरवून आगेकूच करणारा बनकर बाजी मारणार असे वाटत असले तरी चाऊस चांगल्या तयारीत होता. पण, जेतेपदाच्या लढतीत बनकरने शक्तीपेक्षा युक्ती श्ाेष्ठ असल्याचे दाखवून दिले.
ताकदीने भलाभक्कम वाटत असलेल्या चाऊसला थेट भिडण्यापेक्षा ऐनवेळी डावपेच बदलत त्याला नामोहरम करण्याचे बनकरचे डावपेच शेवटी यशस्वी ठरले. पहिल्या फेरीतील ३-१ ही आघाडी त्याला फायदेशीर ठरली.
माजी हिंदकेसरी हरिश्चंद बिराजदार यांच्या गोकुळ तालमीचा पठ्ठा असलेल्या बनकरने मोठ्या सफाईदारपणे किताब मिळवला तेव्हा त्याला आपल्या वडीलांच्या कामगिरीची आठवण झाली. १९७६ साली त्याचे वडील महाराष्ट्र केसरी ठरले होते.
प्रेक्षकांची हुल्लडबाजी
प्रेक्षकांच्या अती उत्साहीपणाचे गालबोट शेवटच्या दिवशी या स्पधेर्ला लागले. तिसऱ्या फेरीत विजय बनकरने एक गुण घेताच त्याचे जेतेपद निश्चित झाले. याचवेळी अतीउत्साहात त्याचे शेकडो पाठिराखे मैदानात घुसले. शेवटी पोलिसांना लाठीमार करून त्यांना बाहेर करावे लागले. याच सामन्यांच्या पहिल्या फेरीत तर बाटल्याही मैदानात फेकल्या गेल्या. तसेच बक्षीस समारंभावेळी खुर्च्या फेकण्यात आल्याने स्पधेर्ची नाचक्की झाली.
Wednesday, 18 May 2011
अनास्थेच्या आखाड्यात हरिश्चंद्राची परवड...
' पुणे तेथे काय उणे' असे म्हणण्याची पद्धत आहे. गेल्या आठवड्यामध्ये 'रुस्तुम-ए-हिंद' हरिश्चंद बिराजदार यांच्यावर तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. गेली पंचवीस-तीस वर्षे पुण्यात गुरुकुल चालविणाऱ्या मल्लविद्येच्या गुरूवरील उपचारांसाठी पैसे कमी पडत होते. तो गोळा करण्यासाठी शिष्यांना धावाधाव करावी लागल होती. ज्या सत्पालला चितपट करून बिराजदारांनी नाव कमावले, तो सत्पाल विमानाने त्यांना बघण्यासाठी पुण्यात येऊन गेला; पण महाराष्ट्रातील नामवंत मल्ल मात्र बिराजदारांकडे फिरकले नाहीत. शरद पवार आणि अजित पवार यांनी आर्थिक मदत करून बिराजदारांना आता आधार दिला असला, तरीही महाराष्ट्रातील कुस्तीक्षेत्र आणि एकूणच क्रीडाक्षेत्र मोठेपणा दाखवायला पुढे का आले नाहीत, हा प्रश्न मनाला सतावत राहतोच...
............
' रुस्तुम-ए-हिंद' हरिश्चंद बिराजदार अत्यवस्थ असून, त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, ही बातमी ऐकल्यावर खरेतर धक्काच बसला. त्यापेक्षा मोठा धक्का बसला तो म्हणजे बिराजदारांना बघण्यासाठी आणि त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी बाहुबली सत्पाल दिल्लीवरून विमानाने आल्याचे कळल्यावर. बिराजदार हे पट्टीचे मल्ल, महाराष्ट्राने त्यांना त्यांच्या सुवर्णकाळामध्ये डोक्यावर घेतलेले. पण बिराजदारांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती त्यांना बेळगावमध्ये बाहुबली सत्पालला चितपट केले, त्यानंतरच. बिराजदार यांच्या कारकिदीर्चा तो अखेरचा काळ होता आणि सत्पालची कारकीर्द बहरलेली होती. त्याच्या विजयाचा वारू बिराजदारांनी रोखला आणि त्यांचा विजय साजरा करण्यासाठी हत्तीवरून साखर वाटली गेली. इतकी लोकप्रियता मिळालेले बिराजदार हे महाराष्ट्राच्या मातीतील मोजक्या मल्लांपैकी एक.
बिराजदार यांच्यावर उपचारासाठी पैशाची व्यवस्था करावी लागत असल्याचे कळल्यावर आणखी धक्का बसला. त्यांच्या शिष्यगणाने धावपळ करून सुमारे सहा लाख रुपये गोळा करून उपचार सुरूही केले होते. पण आणखी मदत लागणार होती. त्यासाठी बातमी करू या का, असे विचारल्यावर त्यांच्या शिष्यांचे म्हणणे होते, बिराजदारांना ते आवडणार नाही. पण पैशाची गरज होतीच. अखेर बिराजदार अत्यवस्थ असल्याची बातमी वर्तमानपत्रांमध्ये आणि काही मोजक्या चॅनेलवर आली. तोपर्यंत त्यांच्या मेंदूवर तीन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार मदत करील असे जाहीर केले; पण सरकारी मदतीचा वेग पाहता ती वेळेवर हातात येईल किंवा नाही, हे समजत नव्हते. अखेर केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या उपचारांची सगळी जबाबदारी उचलली आणि हा प्रश्न सुटला. गेला आठवडा याच धावपळीचा होता. याच दरम्यान सत्पाल पुण्यात येऊन गेला.
साहजिकच सत्पाल आणि बिराजदार यांची तुलना मनात सुरू झाली. इंटरनेटवर बाहुबली सत्पाल असा सर्च दिल्यावर प्रचंड माहिती उपलब्ध झाली. त्याउलट बिराजदारांच्या नावाने सर्च दिल्यानंतर काही बातम्या समोर आल्या. पण ती सलग माहिती नव्हती. कुस्ती परिषदेमध्ये शोधाशोध केल्यावर एक पानभर बायोडाटा उपलब्ध झाला. सत्पाल आणि बिराजदार यांचे बायोडाटा समोर ठेवले. त्यामध्ये अनेक बाबी सारख्या असल्याचे जाणवले. दोघेही शेतकरी कुटुंबातील. शिक्षण साधारणपणे एसएससीच्या आसपास. दोघेही अनेकदा राष्ट्रीय विजेते, दोघांनीही भारताचे ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व केलेले. सत्पालने १९८२ च्या आशियाई स्पधेर्त सुवर्णपदक मिळविलेले, तर बिराजदारांनी १९७० च्या राष्ट्रकुल स्पधेर्त. बिराजदार १९६९ मध्ये 'हिंद केसरी' स्पधेर्चे विजेते, तर सत्पाल १९७६ च्या. बिराजदारांनी १९७२ मध्ये 'रुस्तुम-ए-हिंद' किताब मिळविलेला, तर सत्पालने १९७४ मध्ये. या दोघांची कारकीर्द जवळपास सारखी. आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्पालची कारकीर्द अधिक उजवी; कारण त्याला आशियाई स्पर्धेत ब्राँझ, रौप्य आणि सुवर्णपदकाचा मान. हा फरक सोडला तर बाकीच्या कारकिदीर्त फरक नाही.
पण सत्पालला त्याने पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळाल्यावर पंजाब पोलीसमध्ये अधिकारी केले गेले, तर महाराष्ट्र सरकारने बिराजदारांना नोकरीचे केवळ आश्वासन दिले. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर बिराजदारांना पुन्हा एकदा आश्वासन देण्यात आले, तिकडे आशियाई स्पधेर्त सुवर्णपदक मिळविलेल्या सत्पालला दिल्ली सरकारने शिक्षण उपसंचालक केले. सत्पालला १९७४ मध्ये अर्जुन, तर १९८३ मध्ये 'पद्मश्री'ने गौरविण्यात आले. बिराजदारांना १९७१ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळाला खरा; पण दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळण्यासाठी १९९८ पर्र्यंत वाट पहावी लागली.
तितकेच शिक्षण आणि गुणवत्ता असलेला सत्पाल तिथल्या सरकारमध्ये शिक्षण संचालक होऊ शकतो; पण बिराजदारांना कोरड्या आश्वासनांवर किमान एक तप वाट पहावी लागते. महाराष्ट्र सरकारने अखेर बिराजदारांना नोकरी दिली, तीही कुस्ती संघटक म्हणून, उपसंचालक म्हणून नव्हे. तीदेखील इतक्या उशिरा, की त्यांना पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी अनेकांना आपले वजन खर्च करावे लागले. सुमारे शंभर राष्ट्रीय पदक विजेते तयार करणाऱ्या बिराजदारांना आजही मुख्यमंत्र्यांकडे भेटायला जायचे, तर आठ-दहा चकरा माराव्या लागतात, तर सत्पाल शिष्याने ऑलिंपिक पदक मिळविले म्हणून थेट पंतप्रधानांची भेट घेतो. क्रीडामंत्र्यांनी सत्पालना फोटोतून बाजूला व्हायला सांगितले, तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तर बिराजदार आत्ताआत्तापर्यंत मोटारसायकलवरून आपल्या पठ्ठ्याने पदक मिळविले की त्याचा फोटो घेऊन वर्तमानपत्रांच्या कचेऱ्यांचे उंबरठे झिजवत होते.
हे असे का? हा प्रश्न सातत्याने अस्वस्थ करीत राहिला. नशीब, नशीब म्हटले तरी आपले गाव, आपले राज्य एखाद्यावर इतका अन्याय करू शकते यावर विश्वास बसत नाही. आज सत्पाल मनाचा मोठेपणा दाखवून विमानाने बिराजदारांना भेटायला आले. यामध्ये त्यांचा दिलदारपणा होताच; पण त्यांची आथिर्क बाजूही तितकीच भक्कम होती. हीच उलटी परिस्थिती असती, तर बिराजदारांना हे शक्य झाले असते का? व्यवहाराच्या गाठी सोडविण्यात किंवा मारण्यामध्ये सत्पाल कदाचित बिराजदारांपेक्षा काकणभर सरस असतीलही; पण आपल्या देशात ऑलिंपिक विजेते का होत नाहीत, असा ओरडा करणारा समाज फक्त याच गुणाच्या आधारे एखाद्या माणसाची कदर करतो, असा निष्कर्ष काढायचा का? सरकारने अवेहलना केली म्हणून बिराजदार थांबले नाहीत. पुण्यात गोकुळ वस्ताद तालमीत 'गुरुकुल' सुरू करून त्यांनी राष्ट्रीय विजेते घडविले. अगदी अर्जुन पुरस्कार विजेतेही घडविले. त्याच्या बदल्यात समाजाने त्यांना काय दिले? फक्त समाजानेच नव्हे तर कुस्ती क्षेत्रानेही त्यांना आजपर्यंत काय दिले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आपण खरा प्रयत्न करू, तेव्हाच क्रीडा संस्कृती रुजण्यास प्रारंभ झालेला असेल. तोपर्यंत सगळे काही 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' याप्रमाणे फक्त हवेतच असेल.

Tuesday, 17 May 2011
महाराष्ट्र केसरी आणि रुस्तुम ए हिंद पैलवान अमोल बुचडे

महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे!
पालकमंत्री अजित दादा पवार,नानासाहेब नवले,उपमुख्यमंत्री आर.आर. पाटिल आणि महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे! सलामी देताना!
Monday, 16 May 2011
हिंदकेसरी मारुती माने
महाराष्ट्राच्या मातीतला कोहिनूर हिरा हरपला
हिंदकेसरी मारुती माने यांच्या निधनाचे वृत्त कळताच, कोल्हापुरातील ज्येष्ठ वस्तादांसह मल्ल शोकसागरात बुडाले होते. माने यांनी सादिक पंजाबीला चितपट केलेला क्षण, तब्बल अडीच तासांच्या लढतीत विष्णू सावर्डेकर यांच्यावर मिळविलेला विजयाचा क्षण अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. महाराष्ट्राच्या मातीतला कोहिनूर हिरा, वस्तादांचा वस्ताद, जाणता कुस्तीगीर हरपला, या शब्दांत विविध वस्तादांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर - लहानपणापासूनच आम्ही दोघे एकत्र असायचो. आम्हा दोघांत भावाभावाचे नाते होते. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व सर्वांनाच भावणारे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा आधार तुटला आहे. एक जाणता कुस्तीगीर हरपल्याने कुस्ती क्षेत्राची हानी झाली आहे.
रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार - मारुती माने हे महाराष्ट्राच्या कुस्ती वैभवाचे शिलेदार होते. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून, त्यांच्यासारखा पैलवान आता होणे नाही.
महान भारतकेसरी दादू चौगुले - भारतातला एक चांगला मल्ल, अशी श्री. माने यांची ओळख होती. कठोर मेहनत घेतल्यानंतरच मल्ल मोठा होतो, हीच त्यांची धारणा होती. त्यामुळे ते जेव्हा कोल्हापुरात येत, तेव्हा मल्लांना सरावात सातत्य ठेवण्यास सांगत. त्यांचा तो सल्ला वस्ताद म्हणून नव्हे, तर कोल्हापूरचा पुत्र म्हणून असे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे - माने स्वच्छ मनाचे होते. त्यांचा कुस्ती लौकिक होता. पण शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, हीच मोठी खंत आहे. एका चांगल्या मल्लाचे असे जाणे धक्कादायक आहे. एक मोठ्या मनाचा माणूस आणि कुस्तीचा जाणकार व महाराष्ट्रातला कोहिनूर हिरा काळाच्या पडद्याआड गेला.
माजी ऑलिंपियन मारुती आडकर - मारुती माने हे माझे आराध्य दैवत. त्यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळाले. 1965च्या सादिकविरुद्धच्या कुस्तीने मी प्रभावित होऊन त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेलो. त्याचा मला खूपच फायदा झाला. अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. त्यांच्यासाठी कुस्ती हेच जीवन होते.
हिंदकेसरी दीनानाथसिंह - माने यांच्यासारखा दुसरा मल्ल होणे कठीण आहे. सादिक पंजाबीबरोबर त्यांनी दिलेली लढत आजही स्मरणात आहे. त्यांच्या कुस्तीतील डावपेचावर कुस्तीशौकीन फिदा असायचे. त्यांचे कोल्हापूरवर अतूट प्रेम होते. कोल्हापुरात आल्यानंतर मिसळ ते आवडीने खात; तर गंगावेशमधील दूध कट्ट्यावर एक लिटर दूध पीत. त्यांच्या निधनाने एक लढवय्या मल्ल व वस्तादांचा वस्ताद आपल्यातून निघून गेला आहे.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील - कुस्तीतील डावपेचांचा त्यांचा मोठा अभ्यास होता. त्यामुळे त्यांचे सल्ले मला फारच उपयोगी पडले. आम्ही दोघेही एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांचा सहवास मला नेहमी लाभायचा. त्यांच्याशी गप्पा मारताना एक मोठा मल्ल किती संयमी आणि अभ्यासू असू शकतो, याची जाणीव होई. त्यांच्या जाण्याने नव्या पिढीला दिशा देणारा मार्गदर्शक हरवला आहे.
वस्ताद रसूल हनीफ - अत्यंत कष्टातून माने यांनी कुस्ती क्षेत्रात आपले नाव केले. त्यांनी महाराष्ट्राची शान वाढवली. त्यांच्या जाण्याने नव्या पिढीला आदर्श असणारा मल्ल हरपला आहे.
याला रशियाला पाठवा
1967 मध्ये मॅंचेस्टर येथे मारुती माने यांची रशियाच्या ऍलेक्झांडर मिद्विद या जग जिंकणाऱ्या मल्लाशी विजेतेपदाची लढत होती. त्या वेळी मिद्विद यांची आंतरराष्ट्रीय कुस्तीत मक्तेदारी होती, असे म्हटले तरी चालेल. त्यांच्याविरुद्ध कोणताही मल्ल दोन मिनिटांपेक्षा अधिक काळ टिकू शकत नव्हता. सलग चार ऑलिंपिक आणि चार जागतिक विजेतेपद मिळविणाऱ्या मिद्विद यांना महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने मात्र तब्बल 11 मिनिटे झुंजविले होते. माने ही लढत हरले. ""माने यांना रशियात पाठवा. हा आंतरराष्ट्रीय मैदान गाजविणारच'', अशा शब्दांत मिद्विद यांनी माने यांचा गौरव केला होता.

भाऊंची कारकीर्द
नाव - मारुती ज्ञानू माने (पाटील)
जन्म- 27 डिसेंबर 1938
मृत्यू - 27 जुलै 2010
व्यायामाची पद्धत - पहाटे 2 हजार 500 जोर व 3 हजार बैठका
हुकमी डाव - दुहेरी पट, हात काढून घिस्सा
खुराक - सकाळी एक लिटर व सायंकाळी एक लिटर दूध, दुपारी थंडाई एक लिटर, विविध प्रकारची फळे. एक किलो लोणी, अर्धा किलो तूप, अर्धा किलो मटण, एका वेळी 1 डझन केळी

कुस्ती क्षेत्रात मिळवलेले यश -
सुवर्णपदक- अखिल भारतीय स्पर्धा-(ओरिसा)- 1965
सुवर्णपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- जकार्ता- 1962
रौप्यपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- जकार्ता- 1962
रौप्यपदक- जागतिक स्तरावरील कुस्ती स्पर्धा- रशिया- 1963
हिंदकेसरी- अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा- (पंजाब)- 1964
सुवर्णपदक- अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा- दिल्ली- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. भीमसेन (सेनादल)- दिल्ली- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. महम्मद हनिफ- कोल्हापूर- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. विष्णू सावर्डेकर- कोल्हापूर- 1965
विजेतेपद- विरुद्ध पै. चंदगीराम (हरियाना) - बेळगाव - 1966
रौप्यपदक- विरुद्ध पै. अलेक्झांडर मिद्विद् (रशिया)- 1967
रौप्यपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- (स्कॉटलॅंड)- 1969
विजेतेपद- विरुद्ध पै. सादिक (पंजाबी)- कोल्हापूर- 1970
विजेतेपद- विरुद्ध पै. दत्ता सिंग- कोल्हापूर- 1972

कुस्ती प्रचार आणि प्रसार -
कुस्ती संघटक - महाराष्ट्र शासनातर्फे सन 1981 मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित.
अध्यक्ष - अखिल भारतीय कुस्ती निवड
समिती- 2 वर्षे
अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
(सन 1981-1985 )
सदस्य - अखिल भारतीय कुस्तीगीर परिषद
(सन 1981 पासून, महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद
(सन 1992-1995)
उपाध्यक्ष - अखिल भारतीय माजी मल्ल संघटना
( 92 पासून )

राजकीय कारकीर्द
कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच - 25 वर्षे
सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य - 1960-72
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे
संचालक व उपाध्यक्ष - 1970-80
राज्यसभा खासदार - 1985-1986

पारंपरिक कुस्तीचे प्रतीक
सांगलीजवळच्या कवठेपिरान (ता. मिरज) या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले; पण वस्ताद मारेकरी यांनी हा मौल्यवान हिरा ओळखला. त्याला पैलू पाडण्याचे काम केले. प्रसिद्ध वस्ताद दुडाप्पाण्णा खोकले यांनी त्याला कुस्तीकलेचे धडे दिले. 24 जुलै 1958 रोजी आण्णा पाटोळे (करोली) या प्रबळ पैलवानावर विजय मिळवून हा कोहिनूर हिरा नावारूपाला आला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जबरदस्त आत्मविश्वास व बलाढ्य ताकदीच्या जोरावर कुस्तीतील अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. पहिले "महाराष्ट्र केसरी' पै. दिनकर दह्यारी यांच्याशी 18 एप्रिल 1959 रोजी त्यांची प्रेक्षणीय कुस्ती होऊन ती बरोबरीत सुटली.
त्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस सुरवात झाली. सर्वप्रथम त्यांनी कटक येथे झालेल्या एशियन गेम चाचणी स्पर्धेत पै. भीम सीलाराम यांच्यावर मात केली आणि 1962 च्या जाकार्ता एशियन स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. त्या स्पर्धेत त्यांनी फ्री-स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये सुवर्णपदक व ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात रौप्यपदक अशी पदके मिळवली. या पराक्रमानंतर रशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली; पण त्या वेळी त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
1964 ला करनाल येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत 6 फूट 5 इंच उंचीच्या मेहरदीन पैलवानावर मात करून त्यांनी "हिंदकेसरी'पद मिळवले. त्यानंतर शारीरिक दुखापतीमुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये त्यांना भाग घेता आला नाही. 1970 मध्ये एडिंबरो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. या दरम्यान आप्पा करजगी, भगवान मोरे, नाथा पारगावकर, महंमद हनिफ या त्या वेळच्या अव्वल पैलवानांबरोबर कुस्त्या करून कुस्ती क्षेत्रात त्यांनी दबदबा वाढवला.
कुस्ती इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली कुस्ती म्हणजे 6 मार्च 1965 रोजी झालेली त्यांची व पै. विष्णूपंत सावर्डेकर यांची कुस्ती. कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील ही कुस्ती तब्बल अडीच तास चालली. मैदानात लोकांना बसायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. त्यानंतर सांगलीमध्ये हिंदकेसरी हजरत पटेल, शाहूपुरी यांच्यावर 14 मिनिटांत त्यांनी मात केली. संपूर्ण महाराष्ट्रात ती कुस्ती गाजली.
महान मल्ल सादिक पंजाबीने महाराष्ट्राला आव्हान दिले होते. ते स्वीकारून कोल्हापूर येथे खासबाग मैदानात सादिकला चारीमुंड्या चीत करून त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. आक्रमकता आणि चपळता यात वाक्बगार असणारे मारुती माने यांना लाल मातीतल्या पारंपरिक कुस्तीचे प्रतीकच म्हणावे लागेल.
Subscribe to:
Posts (Atom)