संजय पाटील यांच्यावर समोरुन चौघांनी अंदाधुंद गोळीबार केला . पोटात आणि पाठीत गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते . जखमी अवस्थेत त्यांना जवळच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . मात्र , गोळ्या लागून प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असलेले संजय पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापतीही होते . अलिकडेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या विजयात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता . राजकीय वैमनस्यातून संजय यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता पोलिस व्यक्त करत आहेत . संजय यांचे पंतप्रधान कार्यालयातील मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी घनिष्ठ संबंध होते .
१९९२ साली अमरावतीत 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकाविलेले संजय पाटील पंचायत समितीचे उपसभापती होते. नुकतेच ते कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकपदावरही निवडून आले होते. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गोळेश्वर गावी दुपारी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी निघत असताना पाटील यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्यावर एकूण १३ गोळ्या झाडण्यात आल्या. कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या पाथिर्वावर आटके या मूळगावी हजारो कुस्ती शौकिनांच्या व चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:
Post a Comment