महाराष्ट्रकेसरी विष्णू दगडू पवार यांचं नुकतंच निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलं, मुली, नातवंडं असा परिवार आहे.
सातारा जिल्ह्यातील आर्वी गावचे पवार मुंबईत नोकरी करण्यासाठी वासिंदजवळील दहागाव येथे स्थायिक झाले. कोल्हापूर इथल्या तालमीमध्ये त्यांनी अनेक मल्ल तयार केले, १९५८-५९ मध्ये विख्यात कुस्तीपटू दारासिंग यांच्या तालमीत असताना, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी हा किताब देऊन पवारांना गौरवण्यात आलं. अखिल भारतीय परिषदेचं सुवर्ण पदकही त्यांनी मिळवलं होतं.

No comments:
Post a Comment